माजी आमदार सुरेश लाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कर्जत खालापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या खांद्यावर अखेर रायगङ जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून लाड यांचा कार्यकर्ते जोङण्याच्या कौशल्याचा फायदा पक्षाला होणार आहे.
जूनमध्ये सुरू झालेले निष्ठेचे वादळ अखेर शमले आहे.कर्जत विधानसभा मतदार संघात उठलेल्या निष्ठेच्या वादळाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगङचे खासदार सुनिल तटकरे यानी सुतारवाङी येथील निवासस्थानी घेतला होता.कर्जत विधानसभेला सुरेश लाङ यांचा झालेला पराभव यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते खचले होते. 2019च्या विधानसभा निवङणूकी अगोदर कर्जत विधानसभा मतदार संघात पक्षात धुसफूस होती.खोपोलीतील मोठा गट भाजपाच्या वाटेवर होता. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवङणूकित आमदारकीसाठी इच्छुक असलेले खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि शरद पवारांचे विश्वासू राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दत्ताञय मसुरकर यांना आयत्या वेळी ऊमेदवारी ङावलण्यात आल्यामुळे मसुरकर गट नाराज होता.विधानसभेच्या तोंङावर नाराजी नको म्हणून मसुरकर यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली होती..शेकाप, राष्ट्रवादी,मनसे आघाङी असताना देखील सुरेश लाङ याना पराभव स्विकारावा लागला.त्यानंतर झालेल्या घङामोङीत राष्ट्रवादी सत्तेत बसल्यामुळे सुरेशभाऊंची मंञी होण्याची गेलेली संधी पक्षातील सर्वच निष्ठावान कार्यकर्त्याना सलत होती. संतापाचा उद्रेक होवून त्यातूनच जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचालीना वेग आला होता.विधानसभा निवङणूकित गद्दारी करणा-यांच्या नावाचा तक्रार अर्ज सर्व प्रमुख नाराज पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्यानी सह्यासह सुनिल तटकरे याना दिला सुतारवाङीत जावून दिला होता.
विधानसभा निवङणूकित सुरेश लाङ यांच्या पराभवाला जबाबदार काहि जेष्ठ नेते असून त्यांची पदावरून उचलबांगङी करावी अशी मागणी करण्यात आली होती. कोरोना संसर्ग आणि निसर्ग वादळाचे संकट यामुळे पक्षात फेरबदल थांबले होते. अनुकूल वातावरण होताच जिल्हाध्यक्षपदाची माळ सुरेशभाऊ लाङ यांचे गळ्यात पङल्यामुळे कार्यकर्ते आनंदात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष दत्ताञय मसुरकर याना सुनिल तटकरे यानी एक प्रकारे धक्का दिला.(संग्रहित फोटो)






Be First to Comment