सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कर्जत पोलिस ठाणे हद्दीत 8 घरफोड्या उघडकीस आल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 55 हजार 900 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील आय.पी. मार्केटिंग कंपनीचे ऑफिसच्या खिडकीचे ग्रील उचकटून ऑफिस मधील कामाकरिता असलेला कॉम्प्युटर सेट व ग्रास कटिंग मशीन कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेल्याची फिर्याद पुंडलिक किसन ठोसर यांनी दि.13 जुलै रोजी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केली.कॉ. गु. र.क. 202/2021 भा .द.वि. कलम 454, 457,380,427 अन्वये नोंद करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार गणेश पाटील, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी याबाबत तपास सुरू केला.
त्यावेळी हुमगाव येथे राहणारा एक इसम याचा हात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो इसम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचे हुमगाव येथे राहणारे 4 साथीदार यांनी मिळून कर्जत शहर तसेच कडाव, गौळवाडी,जांभिवली, वैजनाथ, हुमगाव येथे मागील 2 वर्षांपासून 8 घरफोड्या केल्याचे तपासात कबूल केले.
8 गुन्ह्यामधून पोलिसांनी आरोपींकडून सोन्याची चैन, रोख रक्कम, ऍपल कंपनीचे दोन महागडे लॅपटॉप, ऍपल कंपनीचे एअरपॉड, एसर कंपनी चा कॉम्प्युटर सेट, सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही, 5 बॅटर्या गवत कापण्याचे मशीन, असता एकूण 2 लाख 55 हजार 900 रुपयांचा माल हस्तगत करण्यात कर्जत पोलिसांनी यश आले आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.








Be First to Comment