वाहून गेलेल्या दोन भावंडांपैकी मुलीचे शव मिळाले : मुलाचा शोध सुरू
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
खालापूर तालुक्यामधील खोपोली क्रांतीनगरमधील रहिवाशी असलेले दोन सख्खे भाऊ बहीण काल पाताळगंगा नदीपात्रात वाहून गेले होते.
पाताळगंगा नदीपात्रात वाहून गेलेल्या मुलीचे नाव निलंभ्भा श्रीकांत हंचलीकर, वय वर्ष 7 आणि मुलाचे नाव बाबू श्रीकांत हंचलीकर, वय वर्षे 3 असून ते काल सायंकाळी 5:30 ते 6:00 च्या दरम्यान पाताळगंगा नदीपात्रात वाहून गेले होते.
स्थानिक प्रशासनाने शोध मोहिमेचे काम अपघातग्रस्त मदत पथक व खोपोली येथील स्थानिक नागरिक यांच्या मदतीने तात्काळ सुरु केले होते.
आज सकाळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर या मुलीचे (कु.निलंभ्भा श्रीकांत हंचलीकर, वय वर्ष 7) शव सापडले आहे. तर बाबू श्रीकांत हंचलीकर, वय वर्षे 3 याचा शोध अद्याप सुरू आहे.








Be First to Comment