Press "Enter" to skip to content

लॉकडाऊन तोडून पांडवकडा धबधब्यावर जाणाऱ्यांना खारघर पोलिसांनी शिकवला धडा

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

लॉकडाऊन चे उल्लंघन करणारे तसेच पांडवकडा , फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या लोकांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी विनाकारण फिरणारे, मॉर्निंग वॉकला जाणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली असून एकूण 59 लोकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये 34 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

पांडवकडा, फणसवाडी ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे एकूण तेवीस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तरी सर्व नागरिकांनी लॉक डाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.