सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
ऑन ड्युटी चोवीस तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात येत असून शुक्रवारी खालापूर पोलीस ठाण्यात कोरोना चाचणी करण्यात आली. शासनाने फ्रन्टलाइन वर्कर असणाऱ्यांची आरटीपीसी आर
चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत . कोरोना संभाव्य तिसऱ्या लाटे ची पूर्वतयारी म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार कोव्हिड प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

शुक्रवारी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने खालापूर पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोल्हापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते, सपोनि शेखर लवे, महिला पोलीस अधिकारी शेख ,काळे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.









Be First to Comment