सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सह कशेडी आणि वरंध घाटाचा पाहणी दौरा उद्या शनिवार, दि. 24 जुलै 2020 रोजी जाहिर झाला आहे.
शनिवारी सकाळी 8 वाजता मुंबई येथून पेण खारपाडा येथे मोटारीने प्रयाण, सकाळी 10 वाजता खारपाडा येथे आगमन आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी व स्थानिकांसमवेत पाहणी, यानंतर सोयीनुसार खारपाडा ते इंदापूरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाची विविधठिकाणी पाहाणी करण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता इंदापूर येथे आगमन आणि राखीव वेळ ठेवण्यात आला असून दुपारी दोन वाजल्यापासून इंदापूर ते कशेडी घाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गाची नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसोबत पहाणी करण्यात येऊन त्यानंतर सोयीनुसार महाड भोर रस्त्यावरील वरंध घाटातील भुस्खलन दरडप्रवण क्षेत्राची पहाणी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे जाणार आहेत, असा अधिकृत दौरा जाहिर करण्यात आला आहे.
या दौऱ्यानंतर खा.सुनील तटकरे हे रोहे तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी प्रयाण करणार आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.






Be First to Comment