Press "Enter" to skip to content

अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवशीच निधन

आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

सिटी बेल | अलीबाग |

अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते.

त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग – उरण मतदार संघाचे ते आमदार होते.

रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष , प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.