Press "Enter" to skip to content

प्रवाशांनी केली अबोली महिला रिक्षा चालकास मारहाण

रिक्षा भाड्याच्या वादातून मारहाणीची घटना

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

 अबोली महिला रिक्षा चालक महिलेला चार प्रवाशांनी मिळून रिक्षा भाडेच्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे.           

एकाच कुटूंबातील चार जणांनी मिळून रिक्षा चालक महिला सविता बेले यांना मारहाण केली आहे. त्यावेळी अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष संतोष भगत व बेलापूर, नेरुळ विभागीय अबोली महिला रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्याकडे भेट घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर त्यातील एक पुरुषास अटक करण्यात आली आहे, तर त्या रिक्षा चालक महिलेस वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्येमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.