Press "Enter" to skip to content

कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २४ वा वर्धापनदिन साजरा

सिटी बेल | तळोजा |

कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचा २४ वा वर्धापनदिन व संस्थेचे संस्थापक आणि चेअरमन बबनदादा पाटिल ह्यांचे वडील कै. कमळू हिरू पाटील ह्यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त आज बाळासाहेब ठाकरे महाविद्यालय, तळोजे येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, LLB मधे द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक मिळालेल्या कुमारी. रश्मी सासमल आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या अरबाझ मोमीन ह्यांचा सत्कार तसेच मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

ह्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य सखारामशेठ पाटील, शंकरशेठ पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील, शिवसेना उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, शहरप्रमुख बाळाजी मुंबईकर, माजी उपसभापती देविदास पाटील, उपशहरप्रमुख शहर महेश भोईर, विभाग संघटक खोबाजी पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, विभाग अधिकारी जिवन पाटील, प्राचार्य डॉ. राजेश साखरे, प्राचर्य डॉ. राहुल कांबळे, प्राचार्य डॉ. निलेश हांडे, प्राचार्य सौ. सारिका लाजुरकर, प्राचार्य सौ. एस. इनामती, मुख्याध्यापक मधू बोराटे सर, प्राचार्य निलेश गोंधळी सर, मुख्याध्यापक सिद्धार्थ गोडबोले, प्राचार्य सौ. सुनीता राणे इत्यादी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.