2-3 महिन्यांपुर्वी चुलतभावाने केले होते अनैसर्गिक कृत्य
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
तालुक्यातील वाकण खांबेश्वरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने चुलता असलेल्या एका अपंग व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलादपूर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, फिर्यादीत पिडीत बालिकेच्या अल्पवयीन चुलत भावाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास पिडीत आठवर्षीय मुलीच्या काकाने तिला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने तिच्या अपंग असलेल्या काकाने तिला बोलावून घेतले आणि ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून या प्रकाराबाबत कुणासही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार दाखल करतेवेळी पिडीत मुलीने तिच्या आत्या हिच्या घराच्या बाजूच्या खोलीत घेऊन जाऊन तिचा 17 वर्षीय चुलत भाऊ याने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यावर दोन-तीन महिन्यांपूर्वी अनैसर्गिक संबंध ठेवल्याचे सांगितले.
इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलादपूर पोलीसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुरूवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करून पिडीत मुलीच्या अपंग काकाला अटक केली आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी असलेला अल्पवयीन तरूणाला अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि उपनिरिक्षक लोणे यांनी भेट दिली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरिक्षक लोणे हे अधिक तपास करीत आहेत.






Be First to Comment