Press "Enter" to skip to content

नागोठणे मोहल्ल्यातून नव्या कोऱ्या दुचाकीची चोरी

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

केवळ दोन महिनेच वापरलेली नवी कोरी दुचाकी चोरी होण्याचा धक्कादायक प्रकार नागोठण्यातील हुजरा मोहल्ला भागातून सोमवार दि. १२ जुलै च्या मध्यरात्री घडला आहे. होंडा कंपनीच्या ग्राझिया स्कुटी हे मॉडेल असलेल्या लाल-काळ्या रंगाच्या या दुचाकीचा क्रमांक एमएच ०६ सीई ३७७७ असा असून या दुचाकीची किंमत सुमारे ८० हजार रुपये आहे. या दुचाकीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने गाडी मालक आदिल शब्बीर पानसरे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार नागोठण्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या हॉटेल जायकाचे मालक आदिल पानसरे हे ११ जुलै रोजी रात्री १० वाजता घरी आल्यानंतर त्यांनी आपली ही गाडी घरासमोरील पार्किंग मध्ये उभी केली होती. त्यानंतर १२ जुलैला सकाळी ६ वाजता हॉटेल मध्ये जाण्यासाठी गाडी घेण्यास आदिल पानसरे आले असता त्यांना आपली ही गाडी पार्किंग मध्ये दिसली नाही.

मोहल्ल्यातील त्यांच्या घरा शेजारी आजूबाजूला शोध घेवूनही गाडी न सापडल्याने ही गाडी चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर आदिल पानसरे यांनी नागोठणे पोलिसांतकेलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नागोठणे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.