प्रगतशिल शेतकऱ्यांवर कौतुकाची थाप म्हणजे शेती व्यवसायाला चालना – तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
तरुणवर्ग शेतीकडे वळून शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवित आहे. शिक्षणांच्या ज्ञानांच्या माध्यमातून शेतीमधून आपण कोणती पिके घेवू घेवू शकतो.यांची जाणीव निर्माण होवून तरुणवर्गांनी शेतीमध्ये स्वताला झोकून दिले आहे.यामुळे दर वर्षी होत असलेल्या प्रगतशिल शेतक-यांचा शेताच्या बांधावर सन्मान सोहळा निर्माण होत असून शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे प्रगतीशील शेतकऱ्यांवर कौतुकांची थाप असून शेती व्यवसायासाठी चालना निर्माण होत आहे.असे प्रतिसादन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा खालापूर तालुक्यातील कोपरी आणी वडवळ घेण्यात आले यावेळी त्या बोलतांना व्यक्त केले.
रायगड प्रेस क्लब सलग्न खालापूर प्रेस क्लब च्या माध्यमातून दर वर्षी शेताच्या बांधावर सन्मान सोहळा हा कार्यक्रम घेत असतांना या वर्षी कोपरी येथिल योगेश वसंत फाटे यांना देण्यात आले.शेती व्यवसाय करीत असतांना जोड धंदा म्हणून पशुपालन,त्याच बरोबर शेतीमधून विविध पिके घेत आहेत.त्याच बरोबर कोयना पुनर वसाहत ,वडवळ- कुसावडे येथिल आनंदी देवेंद्र सावंत, गेली तीस वर्षापासून शेती करीत आहे,स्वताच्या नावावर शेती नसून पती अपंग असतांना न डगमगता शेतीशी निगडीत राहून आपल्या मुलींना शिक्षण दिले आणी
आणी आज त्या स्वताच्या पायावर भक्कम पणे उभ्या आहेत.

या कार्यक्रमास अर्चना सुळ- नारणवर तालुका कृषी अधिकारी, खालापूर, एन. डी. शिंदे कृ. प. चौक,. एस. डी. राठोड कृ स. चौक, सी. पी. चौकढरी,कृ. स. मोहपाडा , आर. बी. आंधळे कृ. स. गोरठण खु. ,प्रज्ञा पाटील बी. टी. एम. आत्मा टेंभरी ग्रामपंचायत सरपंच दिलीप ठोंबरे,ग्रामसेवक गोकुळदास राठोड, वडवळचे माजी सरपंच जितेंद्र सकपाळ, विदयमान उपसरपंच स्नेहा मराजगे, सदस्य अनिल मराजगे, ग्रामसेवक प्रमोद पाटील, दत्ता मराजगे, श्रीकांत मराजगे, गोदरेज कंपनीचे भंडारकर, दळवी, मेस्त्रि त्याच प्रमाणे सल्लागार भाई ओव्हाळ, रायगड प्रेस क्लब उपाध्यक्ष तथा खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, खालापूर प्रेस क्लब खजिनदार मुकुंद बेंबडे, उपाध्यक्ष एस.टी.पाटील, काशिनाथ जाधव, प्रसिध्दीप्रमुख समाधान दिसले, सदस्य नवज्योत पिंगळे, संतोष गोतारणे, पत्रकार अर्जून कदम, दिपक जगताप आदीप्रमुखासह शेतकरी बांधव – भगिनी उपस्थित होत्या.








Be First to Comment