Press "Enter" to skip to content

मोहोपाडा येथील नढाल धरणात बुडून पिंपरी येथील एका युवकाचा मृत्यू

मोहोपाडा तलावातही युवक बुडाल्याची चर्चा : शोध सुरू

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील नढाल पलस धरणाच्या पाण्यात बावीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर मोहोपाडा तलावातही अंदाजे वीस वर्षीय यूवक बुडाल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.

नढाल पलस धरणावर पिकनिक करण्यासाठी आलेल्या पिंपरी परीसरातील राहणाऱ्या सागर अंबरे (वय २२) याला त्याच्या सोबतच्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला.पण त्याला वाचविणे शक्य झाले नाही.तर मोहोपाडा येथील तलावातही एक वीस वर्षीय युवक बुडाल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्याचा मृतदेह मंगळवारी दुपारपर्यंत सापडला नाही.याकरीता मोहोपाडा तलावावर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी,रसायनी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, गुरुनाथ साठेलकर ग्रुप यांनी भेट दिली आहे.मोहोपाडा तलावाचा खोल भाग चिखल युक्त असून त्यात जलपर्णीं आहे.रसायनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान गेल्या तीन दिवसांपुर्वी कुर्ल्यातील तिघांचा पाली भुतिवली धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पलस धरणात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या खोलीचा अंदाज नसणा-या जलाशयात पोहोण्यास उतरण्याचे धाडस पर्यटक आणि विशेषत तरुणांनी करु नये.असे पोलिसांकडून आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.