Press "Enter" to skip to content

मरणासन्न अवस्थेतील केळी बहरली पाहण्यासाठी लोटली गर्दी

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानाने कितीही मोठमोठे अविष्कार केले तरी निसर्गापुढे ते कमीच असतात.कारण दैनंदिन जीवनात निसर्गात नेहमीच त-त-हेचे अविष्कार पहावयास मिळतात. असाच निसर्गाचा अविष्कार रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथील वारकरी सांप्रदायाचे थोर किर्तनकार, प्रवचनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. मारूतीमहाराज कोलाटकर यांच्या निवासस्थानी पहावयास मिळाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ह.भ.प.मारुतीमहाराज कोलाटकर यांच्या परसबागेत अनेक वर्षापासून गावठी केळीची बाग आहे.या बागेतील केळ्यांना दरवर्षी चांगला बहर येऊन केळीही खायला मिळतात. तर जुनी झालेली केळीची झाडं तोडल्यानंतर कालातंराने नेहमीच नव्याने कोंब येऊन दुसरी झाडं तयार होतात.

असेच एक बहर येऊन गेलेले केळीचे जुनाट झाड तोडून त्याची विल्हेवाटही लावली.अर्थाततच तसे ते झाडाचे आयुष्य संपल्यातच जमा झाल्याने मरणासन्न अवस्थेत होते.म्हणजे त्याला पुन्हा बहर येण्याची कोणतीही श्वावती नव्हती.परंतू मागील काही दिवसांपुर्वी त्या मरणासन्न झालेल्या झाडाला एक नवे कोंब आले.बघता बघता कोंब मोठे होऊन त्याला बहरही आला. झाडाला बहर आल्यानंतर सा-यांनाच आश्चर्य वाटले. आणि निसर्गाचा आगळा वेगळा चमत्कार पाहण्यासाठी अक्षरक्ष: गर्दी लोटली आहे.

तर मरणासन्न अवस्थेतील केळीला आलेला बहर हा निसर्गाचा अदभुत असाच चमत्कार असल्याने सध्या गावात व परिसरात त्याचीच चर्चा सुरू असल्याचे ऐकावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.