निर्णयाला उशीर ठरतोय जिवघेणा !
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
तालुक्यातील कोरोनो बाधित रूग्णांनी शुक्रवारपर्यंत सातशे पन्नास टप्पा ओलांङला असून 22 मृत्यू झाले आहेत.सर्वात चिंतेची बाब म्हणजे कोरोना रूग्णांची अर्धेअधिक आकङेवारी वासांबे ,चौक परिसरातून असताना कोव्हीङ केंद्राला अद्याप मुहर्त मिळालेला नाही.
तालुक्याचा कोरोना अहवाल तयार करताना खोपोली नगरपरिषद,खालापूर नगरपंचायत आणि ग्रामीण भाग असे वर्गीकरण केले जाते.खोपोली आणि ग्रामीण भागात दररोज वीसपेक्षा अधिक रूग्ण मिळत असून आतापर्यंत एका दिवसात 82रूग्ण मिळाल्याची नोंद आहे.शुक्रवारी देखील रसायणीत(चौक मंङळ) 24रूग्णांची भर पङली असून त्या भागातली रूग्ण संख्या 348 झाली आहे. 9 मृत्यू झाले आहेत. चौक,रिस, वाशिवली,मोहपाङा,चांभार्ली,वारद,लोधिवली,आळे आंबिवली भागात कोरोना रूग्ण सापङत आहेत.
खोपोली आणि खालापूरकरांच्या रेट्यामुळे कोव्हीङ उपचाराची सोय जवळच झाली आहे.परंतु रसायणी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण भेटत असताना देखील अद्याप कोव्हीङ केंद्रासाठी जागेचे पर्याय आजमावले जात आहेत.हा परिसर औद्योगिक क्षेञालगत असल्याने या भागात दररोजची वर्दळ कोरोनाचे संकट अधिक वाढवत आहेत.वासांबे ग्रामपंचायत हद्दीत तीन जागाची पाहणी तहसीलदार इरेश चप्पलवार व स्थानिक लोकप्रतिनिधीनी केली होती.त्यानंतर प्रांत वैशाली परदेशी याना माहिती देण्यात आली.परंतु तातङीने हालचाल होणे आवश्यक असताना अद्याप कोव्हीङ केंद्राला मुहर्त मिळत नसल्याने रूग्णांची आणि नातेवाईकांची फरफट होत आहे.शासनस्तरावरून तातङीने मान्यता मिळण्यासाठी पालकमंञी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष रसायणी भेट देवून परिस्थिती पाहवी अशी मागणी होत आहे.
मोहपाङा येथील सेबी रोङला एनएसएम हाॅस्टेलची पाहणी करण्यात आली आहे.अङीचशे बेङ त्याठिकाणी असून सर्व सोयीनी उपयुक्त इमारत असताना कोव्हीङ केंद्रला होत असलेली दिरंगाई न समजण्यासारखी आहे. प्रशांत पाटील-सामाजिक कार्यकर्ता






Be First to Comment