महाड एमआयडीसीतील सिक्वेंट कंपनीतील पोलादपूरचे चौघे कामगार कोरोना संसर्गित
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमुळे परिसरातील रोजगाराथाअना कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या घटनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून महाड एमआयडीसीतील सिक्वेंट कंपनीतील पोलादपूरचे चौघे कामगार कोरोना संसर्गित झाल्याची माहिती आयुषचे डॉ.राजेश शिंदे यांनी येथे दिली.
पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील एक तरूण काही दिवसांपूर्वी महाड एमआयडीसीमधील कोरोना संसर्गित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून झाला. आता शुक्रवारी सायंकाळी पुन्हा महाड एमआयडीसीमधील सिक्वेंट कंपनीतील पोलादपूरचे चौघे कामगार कोरोना संसर्गित झाले आहेत. यामध्ये पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम येथील एक तरूण, कापडे बुद्रुक येथील दोन तरूण तर रानवडी येथील एक तरूण असे चौघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यापुर्वी,महाड एमआयडीसीमधील सिक्वेंट कंपनीतील 19 आणि त्यानंतर 38 कामगार कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. या 38 पैकी 4 पोलादपूर तालुक्यातील रोजगारार्थी आहेत.
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद करण्याच्या मागणीमागील वस्तुस्थिती या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या अनुषंगाने उघड होत आहे.






Be First to Comment