Press "Enter" to skip to content

मोटारसायकल चोरांची दहशत : पनवेल मधुन चार मोटार सायकलींची चोरी

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

पनवेल परिसरातून चार मोटार सायकलींची चोरी झाली असून त्यात तीन तळोजा परिसरातून तर एक कामोठे परिसरातून चोरीस गेलेल्या आहेत.
       

 गंगाधर शेट्टी यांची 30 हजारांची हिरो ग्लॅमर कंपनीची काळ्या व निळ्या रंगाची मोटारसायकल क्र-एमएच 46 बीजे 3074 हि देवीचा पाडा पूनम कलेक्शन दुकानाजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

त्याचप्रमाणे विकास कांबळे यांची 15 हजारांची होडा सीबी शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्र-एमएच 04 जेएल 9514 हि तळोजा औद्योगिक वसाहत डाऊ केमिकल कंपनी येथे उभी केली असता तिची चोरी झाली आहे.

तर सचिन हुंबे यांची 50 हजारांची यामाहा कंपनीची एफझेड ग्रे रंगाची मोटारसायकल क्र-एमएच 46 बीजे 5146 हि बाळकृष्ण यांची चाळ देवीचा पाडा येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर विभोर देठे यांची 45 हजारांची होंडा कंपनीची एक्टीव्हा 3जी ग्रे रंगाची क्र-एमएच 46 एएन 5834 हि एमजीएम हॉस्पिटल येथील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.