Press "Enter" to skip to content

प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे कडून अँटीजेन टेस्टिंग मोहीम

सिटी बेल | याकूब सय्यद | नागोठणे |

सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून शासनाने कोरोना संसर्ग रोगापासून लोकांचा बचाव व्हावा व हा रोग पसरू नये तसेच लोक मृत्यू पडू नये म्हणून शासनाने नियमावली बनविले आहे त्या नियमावलीचे पालन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील असलेले जिल्हा परिषद आरोग्य खाते व तालुक्यातील असलेले पंचायत समिती आरोग्य खाते व प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींनी तंतोतंत या नियमावलीचे पालन करावे असे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.

त्याच शासनाच्या आदेशाचे पालन
कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव पसरू नये कोरोना संसर्ग रोगा पासून लोक निरोगी व सुदृढ रहावे करिता अँटीजेन टेस्टिंगची मोहीम राबविण्याचे आदेश शासनाकडून आरोग्य खात्याला देण्यात आले आहेत.

शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे कडून आज शनिवार दिनांक10/07/2021 रोजी कोरोना अँटीजेन टेस्टिंग ची मोहीम नागोठणे वरचा मोहल्ला येथील राबविण्यात आली असून वरचा मोहल्ला येथे घरोघरी प्रत्येक व्यक्तीची अँटीजेन टेस्टिंग करून घेण्याकरिता सी एच ओ डॉक्टर सौ नीलिमा जाधव सी एच ओ डिंपल जावरे सी एच ओ मनीषा जाधव आशा सौ अंकिता नागोठणेकर भाऊ आमरोसकर अतिशय यांनी मेहनत घेत शेकडो लोकांची अँटीजेन टेस्टिंग केली असून टेस्टिंग मोहिमेत वयोवृद्ध तरुण तसेच सहा ते दहा वर्ष वयोगटातील लहान मुलांचीही टेस्टिंग करण्यात आली.

अँटीजेन टेस्टिंग करण्याकरिता आलेल्या डॉक्टरांना व त्यांच्या टीमला मोहल्ल्यातील लोकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून प्रत्येक व्यक्ती स्वतःहून आपले अँटीजेन टेस्टिंग करून घेत आहेत या टेस्टिंग मध्ये शेकडो लोकांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले व इतर निगेटिव्ह रुग्ण डॉक्टर यांच्या निदर्शनास आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.