सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरणमध्ये आजच्या रिपोर्टमध्ये २९ पॉझिटिव्ह तर १ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. १७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
न्हावाशेवा १, बोरी १, घारापुरी १, कुंभारवाडा ओमकार कॉलनी १, पागोटे १, सोनारी १, मोरा कोळीवाडा १, पिरकोन १, पाणजे १, कोटनाका १, जसखार २, भवरा १, वाणी आळी उरण १, सिंडिकेट बँकेजवळ १, दादरपाडा १, दिघोडे १, जेएनपीटी २, नवीन शेवा १, जासई १, डोंगरी ४, नागाव रोड क्लासिक अव्हेन्यू १, नवापाडा करंजा २, जासई रेल्वे कॉलनी १ असे एकूण २९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. भेंडखळ बीपीसीएल येथील १ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर जासई १, दिघोडे २, खोपटे २, चिरनेर २, घारापुरी ३, उरण ५, नवघर १, करंजा सुरकीचा पाडा १ असे एकूण १७ जण उपचार करून घरी परतले आहेत.
एकूण पॉझिटीव्ह ७३१, बरे झालेले ५४७, उपचार घेणारे १६२, मयत २२ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरणमध्ये पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरणच्या जनतेने प्रशासनावर अवलंबून न रहाता स्वतःच स्वतःची सुरक्षा करण्यासाठी तयार रहावे.






Be First to Comment