सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघा जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
कामोठे ब्रीज संपल्यानंतर मुंबईक़डे जाणाऱ्या लेनजवळून समीर अबिद हुसेन शेख (वय-19, रा.-चेंबूर) हा त्याच्या ताब्यातील डिओ स्कूटी घेऊन पनवेल बाजूकडून चेंबूर येथे जात असताना त्याची मोटारसायकल स्लीप झाल्याने तो खाली पडला व त्यास डोक्यास, छातीस दुखापत झाल्याने कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले आहे.
तर दुसऱ्या घटनेत पनवेल टि पॉईंट ते कळंबोली सर्कलच्या दरम्यान सर्व्हिस रोडवरून भरधाव स्पोर्ट्स बाईक घेऊन यश तिजारे (वय-25) व संकेत शिंदे (वय-25) हे दोघे जात असताना यशचे बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची बाईक फुटपाथवर चढून इलेक्ट्रीक पोलला धडकली. यात दोघेही खाली पडून जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला आहे. या दोन्ही अपघाताची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment