Press "Enter" to skip to content

पळस्पे येथे घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

सिटी बेल| पनवेल | संजय कदम |

बंद घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील पळस्पे येथे घडली आहे.

विशाल देवकर हे सुनिता बेडेकर यांच्या रुममध्ये राहण्यास असून या रुमच्या समोरील दरवाजाची कडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कोणत्या तरी वस्तूने तोडून त्यावाटे आत प्रवेश करून घरातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा मिळून जवळपास 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.

याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.