रोह्यात आज सापडले १९ नवे कोरोना रूग्ण
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
रोहे तालुक्यात कोरोना महामारीचा ताप दिवसेंदिवस अधिक वाढू लागला असून आज त्यामध्ये नव्याने १९
रूग्णांची भर पडली आहे.
इतर दिवसांपेक्षा मागील पाच दिवसांपासूनची वाढत असणारी आकडेवारी समस्त रोहेकरांच्या काळजीचा विषय बनून राहिली आहे. तर शरहीभागासह ग्रामीण भागातही रोज नवे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आज नव्याने १९ रूग्ण सापडल्याने तालुक्याची आतापर्यंतची एकूण रूग्ण संख्याही ४२२ वर जाऊन पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ३०४ असून १०९ रूग्णांवर पुढील उपचार सुरू आहेत.तर कोरोना महामारीत आतापर्यंत तालुक्यात ९ रुग्ण दगावले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात सध्या लाँकडाऊन पुकारला असून अत्यावश्यक सेवाना तेवढी सवलत दिली असून देखील वाढती रुग्णसंख्या ही प्रशासनासह सर्वांचेच काळजीचा विषय होऊन बसली आहे. कोरोना संसर्ग हा गुणाकार पद्धतीने होत असल्याने नागरिकांनी केवल गरज असेल तरच घराबाहेर पडा,विनाकारण घराबाहेर पडू नका.कोरोना महामारीपासून दूर राहायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे व शासनाच्या नियमांचे पालन करून आपल्या व आपल्या परिवाराचे संरक्षण करा.अशाप्रकारचे अवाहन शासकीय यंत्रणेमार्फत केले जाऊ लागले आहे.






Be First to Comment