सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील ग्रा.पंचायत खांब यांच्या वतीने कृषीदिनाचे औचित्य साधून विविध क्रुषी संजीवनी कार्यक्रमातंर्गत कृषीविषयक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,उपसरपंच मनोज शिर्के, प्रदीप चोरगे,सदस्य चंद्रकांत जाधव, संतोष टवले, सचिन महाडीक,रमेश महाले, योगेश खामकर,गणेश आमणकर, सूनीता टवले,दत्ता चितळकर,सदानंद जाधव,अभिजित भोसले हरिश्चंद्र जाधव आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमातंर्गत कृषी पर्यवेक्षक जे. एल.मढवी यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यप्रणालीबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.तर कृषी संजीवनी मोहिम ही सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येत असून या मोहिमेस शेतकरी वर्गाचा ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसादाही लाभत असून या मोहिमेतंर्गत एकाअर्थी शासनच शेतकरी वर्गाच्या दारी आले असून त्याचा फायदा जास्तीत जास्त जणांनी घेतला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी शेतकरी बांधवांना तूर बियाणे वाटप करून तूर लागवडीचे नवतंत्रज्ञान,अधिक उत्पादन कसे घ्यावे याबाबत माहिती देण्यात आली. तर शेती ही आपली दुसरी माता असून शेतकरी वर्गाने शेती क्षेत्राला अधिक प्राधान्य देणे गरजेचे असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सारीका दिघे सहायक कृषी अधिकारी यांना केली तर सदस्य योगेश धामणसे यांनी उपस्थितीतांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








Be First to Comment