प्रियकराला वश करण्यासाठी गेलेली २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणी फसली भामट्या मांत्रीकाच्या जाळ्यात
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
काळी जादू व तंत्र मंत्र करून प्रियकराला वश करून देण्याचा बहाणा करून एका बंगाली बाबाने खारघरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीकडून तब्बल 4 लाख 57 हजार रूपये उकळल्याची घटना घडली आहे.
वसिम रहिस खान उर्फ बाबा कबीर खान असे या बाबाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध फसवणूकीसह अनिष्ट अघोरी कृत्य प्रतिबंधक व निर्मुलन, तसेच काळी जादू या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.








Be First to Comment