राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग करणार्या आश्लेषा दरवडा यांचा महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडून पोलीस पदक देऊन सन्मान
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग आश्लेषा दरवडा यांचा कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या सीमेवरील शेवटचे गाव म्हणजे बेडीसगाव…. वाचताना ऐकताना हे एकच गाव वाटते पण बघताना मात्र शाळेची वाडी, कुंडेवाडी, आंबेवाडी, कोथेरीवाडी, बोरीची वाडी गावठाण वाडी, वाघिणीचीवाडी, वयाची वाडी,आणि तळेवाडी अशा नऊ वाडयांनी बनलेले हे सह्याद्रीच्या डोंगर रांगात… निसर्गाच्या कुशीत… वसलेले बेडीसगाव खरोखरच खुप सुंदर आहे याच गावातील याच गावातील कुंडाची वाडी येथे राहणाऱ्या आश्लेषा जगदीश दरवडा या मुंबई रेल्वे पोलीसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग खेळतात. त्यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांचे कडून पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे आश्लेषाताईंच्या मेहनतीला मिळालेले फळ आहे.

यामुळे आम्हा महिलांना त्यांच्यापासून निश्चितच कामात प्रेरणा मिळेल …ज्या महिलांना भविष्यात काहीतरी करण्याची इच्छा आहे अशा महिलांना यामुळे बळ आणि प्रोत्साहन मिळेल. याची जाणीव आम्हां महिलावर्गाला असल्यामुळेच कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आश्लेषा ताईंच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले असे ॲड. रंजना धुळे यांनी सांगितले.
त्यावेळी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा ॲड. रंजना धुळे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा हिरा दुबे, उकरूळच्या सरपंच वंदना थोरवे, नांदगवच्या सरपंच दीपिका आसवले, बेडीसगवाच्या उपसरपंच बुधी दरवडा, मालू निरगुडा, अक्षय चंचे आदी उपस्थित होते.








Be First to Comment