Press "Enter" to skip to content

वाजे येथील कुंडी धबधब्याच्या खोल खड्ड्यात बूडून तरूणाचा मृत्यु

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील वाजे येथील कुंडी ‌धबधब्यावर आपल्या मित्रांसह वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचा धबधब्याच्या तालुक्यातील खोल खड्डयात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज घडली आहे.

पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीत कुंडी धबधबा येथे आज मुंबई येथील शिवडी परिसरातील ६ मित्र फिरण्यासाठी गेले असता सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास एक मित्र नामे मौसिन मुघल वय १९ वर्षे व त्याचा मित्र नामे सिद्धेश संजय माने वय १९ वर्ष या दोघांचा पाय घसरून खाली पडले. यातील सिद्धेश हा एका मुलाचा पाय पकडून वर आला परंतु मौसिन हा कुंडी धबधब्याच्या खोल खड्ड्यात पाण्यात बुडून मयत झाला.

मयत मुलास स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने बाहेर काढून पनवेल जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता तेथे त्याला मयत घोषित केले. मौसेन याचे वडील परदेशात कामाला असून तो एकूलता एक मुलगा होता. कॉलेजच्या कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.