लॉकडाऊनमुळे मुबंई गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाका येथील गटार लाईनच्या कामाला वेग
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड आंबेवाडी नाका येथील गटार लाईन कामाची गेली कित्येक दिवस दिरंगाई करुन हा रस्ता पाच फुट खोदून ठेवल्याने पहिल्याच पावसात गटारलाईन पूर्णपणे भरुन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता संपूर्ण रायगड जिल्हा लॉक डाऊन करण्यात आला यामुळे कोलाड बाजरपेठत गर्दी कमी झाली.व या लॉक डाऊनमुळे कोलाड येथील गटार लाईनचे काम वेगाने सुरु असुन हे काम लवकरच पूर्ण होईल याचे संकेत मिळत आहे या गटाराचे काम पावसाळयापूर्वी पुर्ण न झाल्यास मोठा धोका तसेच येथील येजा करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊन या गटारांत पावसाचे पाणी साचल्याने संबधित बाजार पेठेत व नाक्यावर पूरपरिस्थिती व रोगराई पसरण्याची भीती निर्माण होईल अशी बातमी वर्तमान पात्रातून प्रसिद्ध झाली होती ती पूर्णपणे खरी झाल्याची दिसून आले .
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका येथील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याच्या कडेनी असणारी ही गटार लाईन गेले कित्येक महिन्या पासून पाच फुट खोल खोदून ठेवली होती या गटार लाईनच्या दोन्ही बाजुला किराणा स्टोअर्स, स्वीट मार्ट व पेपर एजन्सी, पान शॉप, कापड दुकान,मोबाईल शॉपी, हार्डवेअर , ज्वलर्स, फोटो ग्राफर्स,मटण शॉपी, दवाखाने, मेडिकल,बँका, पुस्तके विक्रेते,फळ विक्रेते व इतर विविध प्रकारची दुकाने आहेत सध्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव लॉक डाऊन व टाळेबंदीमुळे ग्राहक वर्ग व रहदारी कमी तसेच दुकाने बंद असलीतरी येथील व्यापारी दुकाच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात परंतु येथील रहिवाशांना अत्यावश्यक वस्तु खरेदीसाठी या गटाराच्या गटाराच्या बाजुनी येजा करावी लागत आहे या दृष्टीने खोदून ठेवलेल्या गटाराचे काम पूर्ण होणे नारिकांच्या हिताचे आहे याविषयी आ.अनिकेत तटकरे यांनी या गटार लाईन ची पाहणी करुन या गटाराचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारा दिले होते.
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५जुलै ते २६जुलै रायगड जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आला या कालावधीत पावसाने दडी मारली याचा फायदा घेत शेवटी आंबेवाडी बाजारपेठेतील गटार लाईनच्या कामाला वेगाने सुरुवात करण्यात आली व काही दिवसात पूर्ण होईल याचे संकेत मिळत आहे.






Be First to Comment