सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील मढाली आदिवासीं वाडी, ऐनवहाळ तेथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीआहे, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या खल्यात बाहेर एकटीच खेळत असताना, आरोपी राहणार मढाली आदिवासीं वाडी, पो. ऐनवहाळ तालुका रोहा, वय वर्ष २२ याने त्या लहान मुलीस त्याचे राहते घरात बोलाऊन एकटी असल्याचा फायदा घेऊन , घराचा दरवाजा लाऊन नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे, कोलाड पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरिक्षक शुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती बोराडे, पोलिस ए एल घायवट, हे पुढील तपास करत आहेत.आरोपी विरोधात कोलाड पोलिस स्टेशन मध्ये भादवी कलम ३७६ नुसार बाल अत्याचार संरक्षण पोस्कौ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







Be First to Comment