Press "Enter" to skip to content

पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ची धडाकेबाज कामगिरी

मोक्का मधून सुटलेला व अल्पवयीन मुलीवरील बलात्कार च्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासह अटक

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

मोक्का मधून सुटलेला व अल्पवयीन मुलीवरील बलात्कार च्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासह पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 कडून अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त बी.के.सिंग अपर पोलीस आंयुक्त (गुन्हे) डॉ. बी.जी.शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील  यांनीं अवैध अग्णिशस्त्र विरोधी मोहीम पंधरवडा राबवणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने गुन्हे शाखा कक्ष-02, नवी मुंबई चे पो.उप.निरी. वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहीतीनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील मोक्का केसमधुन नुकताच सुटलेला, गोळीबार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, पोलीसांवर हल्ले करणारा सराईत गुन्हेगार व ठाणे आयुक्तालयाच्या अभिलेखावर बलात्कार, पोक्सो च्या गुन्ह्यामध्ये पाहीजे असलेला आरोपी प्रतिक मनोहर शिवपुज हा तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे जवळ, अग्णिशस्त्रासह शेवरलेट कारमधुन येणार असल्याची खात्रिशीर माहीती मिळाली.

सदरबाबत  सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे ) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-02 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वखाली स पो नि गणेश कराड, प्रवीण पाटील, पो उप नि वैभव रोंगे , मानसिंग पाटील , पो.ह.अनिल पाटील, गडदे , सुनील कुदले दिपक डोंगर, सचिन म्हात्रे, रुपेश पाटील, प्रशांत काटकर, सुनील साळुंखे, भोपी, सुर्यवाीं हे  अधिकारी कर्मचारी यांची पथके बनवुन तळोजा कारागृहाच्या जवळ सापळा लावुन थांबले असता, सदर बातमीमधील  कार येवुन थांबली कारमधील इसमास पोलीसांची चाहुल लागल्याने ते पळुन जाण्याच्या तयारीत असताना, सदर कारला पोलीस पथकाचे ताब्यातील एक कार आडवी लावुन थांबवण्याचा प्रयत्न केला, सदर कार चालकाने त्याचे ताब्यातील कार फुटपाथवर चढवल्याने सदर कारच्या टायरचा फूटून ती  थांबली. त्यानंतर लगेच चारही बाजुनी सदर कारला घेराव घालुन कारमधील इसम नामे प्रतिक मनोहर शिवपुजे, वय 27 वर्षे, रा. गणपत म्हात्रे बिल्डींग, रुम नं. 401 चौथा माळा, शिवाजी तलाव पाळी रोड, घनसोली गाव नवी मुंबई व त्याचेसोबत लक्ष्मण माणिक राठोड वय 21 वर्षे, ऱा. न्यु गोल्डन नगर झोपडपट्टी, नौसील नाका, रुम नं. 249, घनसोली, नवी मुंबई यास ताब्यात घेतले असता प्रतिक शिवपुजे याचे कडे एक देशीं बनावटीचे पिस्टल व दोन जिवन्त काडतूस  मिळुन आले व लक्ष्मण राठोड याचे खिशामध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यांचेविरुद्ध खारघर पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजी क्र.235/2021 भारतिय शस्त्र अधिनीयम कायदा कलम 3,25 अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.  

आरोपी प्रतिक मनोहर शिवपुजे हा कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे गु.रजी. क्र. 290/2020 भा.दं.वि. कलम 363,376,34 सह पोक्सो कायदा कलम 4,8,12 या गुन्ह्यामध्ये पाहीजे आरोपी आहे. तर आरोपी प्रतिक मनोहर शिवपुजे याने कोपरखैरणे, ए.पी.एम.सी. पोलीस ठाणे, वाशी पोलीस ठाणे, रबाळे, मुलुंड, ठाणेनगर, रबाळे येथे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी लक्ष्मण माणिक राठोड याच्यावर रबाळे येथे 3 गुन्हे दाखल आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.