मृत्यूंच्या वाढत्या संख्येने रोहेकर धास्तावले तर ३७ नव्या रुग्णांची भर
४६१ रुग्णांवर उपचार ३४ रुग्णांची मात
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी अनेक नवनवे प्रशासकीय यंत्रणेकडून निर्बंध लावले जात आहेत तरी देखील कोरोनाचा वाढता कहर नागरिकांच्या जीवावरच उठला आहे.
शुक्रवारी दि २ जून रोजी एकाच दिवशी पुन्हा पाच कोरोना बाधित रुणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर ३७ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने पुन्हा रोहा तालुक्यात संसर्ग व घबराटीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
शुक्रवार दि २ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी पाच कोरोना बाधित रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला त्यात नवे ३७ रुग्णांची भर तर ३४ रुग्णांनी कोरोणावर मात करत ठणठणीत बरे होत घरी परतले या आधी दोन दिवसांपूर्वी तालुक्यात एकाच दिवशी चार जणांचा बळी गेला त्या पाठोपाठ शुक्रवारी मोठा धक्का देत पुन्हा उपचारादरम्यान पाच जणांचा बळी गेला आहे.
उपचारा दरम्यान रुग्णांचा होत असलेला मृत्यू हा आता रोहेकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सातत्याने मृत्यू दरात वाढ होत असल्याने नागरिकांसह प्रशासन चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात आजपर्यंत एकूण २१४ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नागरिकांना अधिक धोकादायक ठरत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येत अधिक भर पडत शुक्रवारी २ जुलै रोजी त्यात ३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. २जुलै रोजी सायंकाळी मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यात नवीन ३७ रुग्णआढळले आहेत तर ३४ रुग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहेत परंतु दुर्दैवाने मात्र पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ही बाब मात्र रोहेकरांसाठी चिंतेची आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणा व प्रशाकीय यंत्रणेवर दिवसेंदिवस अधिक ताण निर्माण झाले आहे कडक निरबंध असून देखील वाढ होत असल्याने चिंता वाढल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील कोरोनाचे एकूण ४६१ रुग्ण आता विविध ठिकाणी उपचार घेत असून कोविड १९ ने बाधित झालेले एकूण रुग्ण संख्या ६८८७ वर पोहचली तर आता पर्यंत २१४ रुग्णांचा उपचारा दरम्यान दुर्दैवाने कोरोनाशी झुंज देत मृत्यू झाला आहे.आरोग्य यंत्रणेच्या यस्ववी प्रयत्ना नंतर तसेच ,स्वतःच्या इच्छाशक्ती व रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर आता पर्यंत रोहा तालुक्यात ६२१२ रुग्णांनी कोरोणावर यशस्वीपणे मात करत ठणठणीत बरे होत सुखरूप घरी परतल्याची माहिती देण्यात आली आहे.
रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी अधिक दक्षता घेण्यासाठी प्रशाकीय यंत्रणा सज्ज होत जनजागृती करतांना दिसत आहे.








Be First to Comment