Press "Enter" to skip to content

संघर्षाच्या सूर्याचा अस्त
‌वामनराव बाळू घरत यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / खारपाडा- पेण (अजय शिवकर )

पेण तालुक्यातील खारपाडा दुश्मी येथील रहिवासी माजी पोलिस पाटील वामनराव बाळू घरत यांचे मंगळवार २१ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी आहे.
वामनराव यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४९ ला झाला ते जन्मापासून एका पायाने अपंग होते,पण दैवाने दिलेल्या नशिबावर रडत न बसता १९६७ साली अकरावी पर्यत शिक्षण घेऊन झारापकर टेलरिंग कॉलेज दादर-मुंबई येथे प्रशिक्षण घेऊन पंचक्रोषीतील एक प्रख्यात टेलरींग मास्टर म्हणून नावाजले गेले काही संस्था तसेच स्वतःच्या घरी अनेकांना शिवणकला शिकवली त्यांच्या हातून हजारो शिष्य घडले. वामनराव अपंग असून सुद्धा तरुणपणी झाडावर चढणे ,साप पकडणे, पाण्यात पोहणे,कबड्डी रायडर,हॉलिबॉल अॅम्पायर, आध्यय वाचक, भारूड,नाटक अशा कित्येक कलांमध्ये पारंगत होते ,खारपाडा येथील पाताळगंगा नदीच्या पत्रात काही मित्रांना पोहायला शिकवून बुडतानादेखील वाचवले व अंधारात सुद्धा अंदाजाने साप पकडण्याचे त्यांचे किस्से आजही लोक सांगतात. ते खूप विचारी हुशार होते त्या बरोबरच अतिशय शिस्तप्रिय होते,त्यांच्या डोळ्यात आग व आवाजात जरब होती त्यामुळेच १० वर्षाच्या पोलिस पाटील कार्यकालात अनेक गोरगरीबांच्या न्यायासाठी त्यांनी अहोरात्र सेवा करून समाजासाठी एक आदर्श ठेवला.
त्यांची दशक्रिया विधी गुरूवारी ३० जुलै व उत्तरकार्य रविवारी दिनांक २ ऑगस्ट रोजी राहत्या घरी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.