Press "Enter" to skip to content

नामांकित कंपनीच्या नावाची बनावट प्रिंट पत्र्यावर मारून विक्री, गुन्हा दाखल

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

जे.एस.डब्लू. स्टील कोटेड प्रा.लि. या कंपनीचे 0.50 एमएम अशा प्रकरची बनावट प्रिंट पत्र्यावर मारून ते विक्रीस उपलब्ध केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पळस्पे येथील पी.जितेंद्र कंपनीच्या गोडाऊनमध्ये अशा प्रकारे जे.एस.डब्लू. स्टील कोटेड प्रा.लि. या कंपनीचे 0.50 एमएम अशा प्रकरची बनावट प्रिंट पत्र्यावर मारून ते विक्रीस उपलब्ध केल्याची माहिती तक्रार दाराने पनवेल शहर पोलिसांना देताच त्याठिकाणी विशेष पथकाने छापा मारून 1,57,064 रूपये किंमतीचे एकूण 155 पत्रे हस्तगत केले आहे. या प्रकरणी मॅनेजर आशिष गोस्वामी व निर्मल शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.