सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
एक 17 वर्षीय मुलगा पाण्याच्या बाटल्या आणण्यासाठी घराबाहेर पडला तो अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मुलाचे नाव कु.करिम अब्दुल शेख असे असून पनवेल रेल्वे स्टेशन जवळील आझाद नगर गंगाराम टॉकीजच्या बाजूला राहत्या घरात असलेल्या लोकांनी दुकानातून पाण्याच्या बाटल्या विकत घेवून ये असे त्याला सांगितले. त्यामुळे तो घराबाहेर पडला तो अद्याप घरी परतला नाही.
तो अंगाने मजबूत, रंग सावळा, डोळे काळे, केस काळे बारीक, नाक सरळ असून अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व चॉकलेटी रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक दयानंद महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधावा.








Be First to Comment