Press "Enter" to skip to content

गांजा सेवन करणार्‍या विरोधात तालुका पोलिसांनी केली कारवाई

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

बेकायदेशीररित्या गांजा सेवन केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने एका व्यक्तीविरोधात कारवाई केली आहे.

तालुक्यातील कसळखंड येथील नवकार लॉजिस्टीक कंपनीच्या लेबर कॅम्पच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दिपक पासवान (27) हा गांजा या प्रतिबंधक अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक विजय खेडकर, नितीन पगार, सुनील कारोटे, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या इसमाला ताब्यात घेतले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.