Press "Enter" to skip to content

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले अंमली पदार्थ विरोधात कारवाई

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

नशा मुक्त नवी मुंबई व अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेंतर्गत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने एका इसमाविरुद्ध गांजा सेवन करण्याप्रकरणी कारवाई केली आहे.

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन पवार हा संबंधित गुन्ह्याबाबत अधिक माहिती घेत असताना खास बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली की, शहराजवळील वडघर येथील एका रिकाम्या झोपडीमध्ये अकील अमरुद्दीन शेख (45) हा त्या ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करीत आहे.

त्यानुसार सहा.पो.निरीक्षक प्रवीण फडतरे, पो.उपनिरीक्षक मानसिंग पाटील, सहा.निरीक्षक सुनील साळुंखे, पो.हवा.सचिन पवार, पो.हवा.प्रशांत काटकर, पोलीस नाईक डोंगरे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या इसमाला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध एनडीपीसी कायदा कलम 8 (क), 27 अन्वये कारवाई केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.