सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रोहे तालुक्यातील कोएसोचे माध्य.विद्यालय घोसाळे या विद्यालयास सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळ आणि त्यामध्ये झालेल्या शासकीय व शैक्षणिक इमारतींचे प्रचंड नुकसान पाहून रायगडचे खासदार सुनील तटकरे व रायगड जिल्हा पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या माध्यमातून आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या वतीने सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातूनतून एक मदतीचा हात म्हणून कोएसोचे माध्यमिक विद्यालय घोसाळेच्या इमारतीसाठी
सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पं.समिती माजी सदस्य किसन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष किरण मोरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक द.र.पाटील, शेकाप तालुका युवक खजिनदार रोशन गांगल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण भगत,दिलीप मयेकर, अजय भोस्तेकर, मोरेश्वर कटे आणि पक्ष्याचे जेष्ट व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून रोहे तालुक्यात शैक्षणिक विकासाच्या द्रुष्टीने विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजनाबरोबर शैक्षणिक सहाय्य केले जात आहे.तर यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव या संस्थेचे पाच तर नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे तीन विद्यालयास सिमेंट पत्रे देऊन सहकार्य केले आहे.






Be First to Comment