Press "Enter" to skip to content

कोविड सेंटरसाठी कोरोना प्रतिबंध साहित्य व स्तनदामातांना सकस आहार वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडिसी हद्दीतील पेहचान प्रोजेक्ट पाताळगंगा अंतर्गत कोरोना पार्श्वभूमीवर विविध उपक्रम सुरू असून इंदेमित्सू ल्युब्रिकांट प्रा.लिमिटेड व येरला प्रोजेक्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदेमित्सुचे डेप्युटी मॅनेजर स्वप्निला आंबेकर व सिनिअर मॅनेजर भुषण दामले यांच्या हस्ते गटविकास अधिकारी लता मोहिते यांच्याकडे नागरिकांसाठी कोविड प्रतिबंध साहित्य देण्यात आले.

यात थर्मल स्कॅनर,एन 95 मास्क, सॅनिटायझर बाॅटल आदीचा समावेश आहे.

यावेळी गटविकास अधिकारी म्हणाल्या की हे साहित्य आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कर्मचा-यांना व कोविड सेंटरमध्ये देण्यात येईल.तसेच पेहचान प्रोजेक्ट पाताळगंगा यांच्यावतीने रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडिसी हद्दीतील पंधरा गावांतील स्तनदामाता,गरोदरमाता यांना सकस आहार किट दिले जाते.तसेच बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करणे,प्रशिक्षण देण्याचे काम पेहचान प्रोजेक्ट करीत आहे असे गटविकास अधिकारी लता मोहिते म्हणाल्या.यावेली ग्रामसेविका अर्चंना देशमुख, आरोग्य विस्तार अधिकारी कांबळे,पेहचान प्रोजेक्टचे प्रकल्पसमन्वयक देवदास झेंडे, म्हेत्रे साहेब आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश घरत यांनी इंदेमित्सू ल्युब्रिकांट प्रा.लि.,येरला प्रोजेक्ट सोसायटी व पेहचान प्रोजेक्ट पाताळगंगा यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.