सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील राजखलाटी या गावचे प्रतिष्ठित नागरिक व आपल्या व्यवसायाचे निमित्ताने सध्या मुंबई येथे वास्तवास असलेले श्री.व सौ.सुधीर मारुती मराठे यांनी व त्यांचे मित्र संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने विविध शालेय साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी श्री.व सौ.सुधीर मारुती मराठे यांनी व त्यांचे मित्र संजय पाटील यांनी ६४ विद्यार्थ्यांना स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिका व चप्पल तसेच अन्य
शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी तर जोपासलीच याशिवाय एक प्रेरणादायक उपक्रम संपन्न केला असल्याचे परिसरात बोलले जात आहे.या कार्यक्रमास शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण धनावडे, सदस्य रोशनी बारस्कर,.वर्षा गोफन यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व साहित्य मिळाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुधीर मराठे यांचे जन्मगाव राजखलाटी आहे तर सध्याचे वास्तव्य मुंबईत असल्याने गावाला येत असताना शाळेतील मुलांच्या पायात नसलेली चप्पल पाहून त्यांच्या मनात याबाबत खंत निर्माण झाली.व त्याच वेळेस त्यानी मनाशी ठरवलं की ग्रामीण भागातील माझ्या विद्यार्थ्यांच्या पायाला बसणारे चटके चप्पल रूपाने दूर करण्याचे मनोमन ठरवून याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते रोशन बारस्कर यांच्या कानावर घातली व त्यांनी मुख्याध्यापक चंद्रकांत वरखले यांची भेट घेऊन शाळेचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पायातील चप्पल देण्याचे केलेली इच्छा प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवली व यापुढेही आपणास शैक्षणिक स्वरूपात मदत लागल्यास आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.सुधीर मराठे व सौ.मराठे तसेच संजय पाटील यांनी शाळेस केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल शा.व्य.समितीचे अध्यक्ष लक्ष्मण धनावडे व मुख्याध्यापक चंद्रकांत वरखले यांनी यावेळी विशेष आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.








Be First to Comment