शाळा चालू नसताना अन्य उपक्रमांच्या फी ला तीव्र विरोध
पालकांनी राधा कृष्ण मंदिर कळंबोली येथे घेतलेल्या बैठकीत आंदोलनाचा दिला इशारा
सिटी बेल | कळंबोली | प्रतिनिधी |
कोरोना महामारीत शाळा बंद असताना आँनलाईन शिक्षण चालू असताना सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापनाकडून आँनलाईन ट्युशन फी बरोबर अन्य उपक्रमाची फी आकारण्यात आली आहे. ती वसुलीसाठी पालकांना तगदा लावताना आँनलाईन लिंक बंद करू अशा धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे पालक वर्गात तीव्र नाराजी पसरली असून पालक वर्गानी राधा कृष्ण मंदिर कळंबोली येथे आयोजित बैठकीत शाळे विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर शाळेनी अल्पसंख्याक म्हणून शाळेची उभारणी केली आहे त्याप्रमाणे शाळेचा कामकाज केला जातो का ? याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीत उद्योगधंदे, व्यवसाय बंद होवून अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जागतिक वैश्विक संकट असून आर्थिक संकटाचा सामना करावा लगत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थेनी फी वाढ करू नये, तसेच पालकांनी त्यांना शक्य होईल तशी टप्प्याटप्प्याने फी भरावी, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र असे असतानाही फी भरू न शकल्याने पनवेल तालुक्यातील अनेक शाळांनी मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून त्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवले आहे. अनेक शाळा पालकांच्या विनंतीला न जुमानता अरेरावी पणे 100 टक्के फी ची मागणी करीत आहेत. जी मागणी महामारीच्या काळात अवास्तव आणि दुर्दैवी आहे. त्यांनी कित्येक मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे आणि भारतीय संविधानाच्या शिक्षणाच्या अधिकाराचा अपमान केलेला आहे. अश्या शाळांनी त्वरित मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करावे आणि फीचा तगादा न लावता अवाजवी फी वसुली करू नये या करिता पालक संघटनेतर्फे पालक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेंट जोसेफ शाळा कळंबोली विरोधात नगरसेवक बबन मुकादम यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशेच्यावर पालक उपस्थित होते. या बैठकीत बोलताना बबन मुकादम यांनी सांगितले शाळेची दादागिरी मोडीत काढायची असेल तर पालकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. न्यायालयाने शाळा बंद असताना ट्युशन फि व्यतिरिक्त अन्य उपक्रमांची फी आकारावी असा कोणताही निर्णय दिलेला नाही आणि दिला आहे तर तो त्या शाळानी दाखवावा. त्याच प्रमाणे कोणत्याही विद्यार्थांचे शिक्षण थांबविण्याचा अधिकार कोणत्याही शाळेला नाही त्याचा जाब विचारला पाहिजे त्यासाठी तुम्ही माझ्या सोबत रहा. शाळा व्यवस्थापन ऐकत नसेल तर पुढे अनेक मार्ग आहेत त्या मार्गाचा अवलंब करून शाळा व्यवस्थापनाला धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे आता नाही तर कधीच नाही या विचाराने आपण शनिवारी एकत्र येवून शाळा व्यवस्थापनाला जाब विचारणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त संख्येने हजर राहा असे आवाहन मुकादम यांनी केले. यावेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
पनवेल परिसरात करोना संसर्ग सुरू असतांना, शैक्षणिक वर्षे कधी सुरू होईल याची खात्री नसतांना काही शाळांच्या व्यवस्थापनाकडून पालकांकडून आगामी शैक्षणिक वर्षासाठी ‘फी’ चा तगादा लावण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नव्याने ‘फी’ वाढ प्रस्तावित आहे. अशा सर्व शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार येताच चौकशी करून करवाईचे आदेश पनवेलचे गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील पनवेल परिसरातील खाजगी शाळा मुख्याध्यापक यांना पत्र काढले आहेत. या निवेदनाला काही शाळा जुमानत नसून आँनलाईन लिंक बंद करण्याच्या धमक्या देत आहेत तर काहींच्या लिंक बंद केल्या आहेत. यावेळी पाटील यांनी तात्काळ याविषयाची गाम्भीर्याने दखल घेत पनवेल परिसरातील सर्व खाजगी शाळेच्या मुख्यध्यापकांना पत्र काढले यामध्ये पालकांकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही विध्यार्थ्याना फी न भरल्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये, सर्व विध्यार्थ्यांना तात्काळ ऑनलाईन शिक्षण सुरु करून विध्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी असे या पत्रामध्ये दिले आहे.







Be First to Comment