विद्यार्थी समाधानी : व्यवस्थापनाचे व छाञभारतीचे मानले आभार !
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी साठी अडवणुक न करता प्रवेश देण्यात यावा असे पत्र आज रायगड छात्रभारतीचे अध्यक्ष जितेश किर्दकुडे यांनी C.K.T महाविद्यालयाच्या प्राचार्यानां दिले व प्राचार्यांशी चर्चा केली.
यावर प्राचार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी ची रक्कम अधिक हफ्त्यांमध्ये भरण्याची मुभा देऊ व त्यातही ज्या मुलांना अडचण असेल त्यांच्याशी बोलुन त्यांचा प्रवेश सुनिश्चित करु असे आश्वस्त केले.
करोनामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. प्रचंड आर्थिक महामारीशी लोकांना सामना करावा लागत आहे. अश्या सर्व परिस्थितीत गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरणे शक्य नाही. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने ठरवुन दिलेल्या हफ्त्याने सुध्दा फी भरणे कठीण असल्याने विद्यार्थ्यांना शक्य तेवढी रक्कम भरुन प्रवेश देण्यात यावा व हफ्त्यांची मुदत जास्त व रक्कम कमी या नियमाने विद्यार्थ्यांनकडुन फी घ्यावी..
उपरोक्त बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी साठी वेठीस न भरता दिलासा द्यावा ही विनंती पत्राद्वारे अध्यक्ष जितेश किर्दकुडे यांनी आज केली होती. त्याला व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.






Be First to Comment