Press "Enter" to skip to content

पोलिसाची मुलगी परदेशात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी यांची कन्या

नवी मुंबई पोलीस व मित्र परिवाराकडून शुभेच्छाचा वर्षाव

सिटी बेल | संजय कदम | पनवेल |

पनवेल परिसरात राहणारे तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी यांची मुलगी पूजा लक्ष्मीकांत मोटवानी हिने जर्मनी देशात एमबीएचे शिक्षण घेत असताना ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तसेच जर्मनीमध्ये नोकरीसुद्धा लागली आहे. त्यामुळे जर्मनीमधील मित्र परिवार तसेच नवी मुंबई पोलीस व परिवाराकडून पूजावर शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.

सध्या तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत मोटवानी यांची कन्या पूजा मोटवानी हिने दहावी पर्यतचे शिक्षण कळंबोली येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर पूजा हिने 2015 मध्ये बी.कॉम साठी वर्षी येथील मॉडर्न कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथे तिने यश मिळविले. त्याचबरोबर 2017 मध्ये एमबीए मार्केटिंग मध्ये स्वामी विवेकानंद कॉलेज चेंबूर येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याठिकाणी प्रथम श्रेणीत आली होती. यावेळी पूजाने आपल्याला पुढील शिक्षण परदेशामध्ये करण्याचा निश्चय केला. परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी उच्च शिक्षणाची जिद्द आणि इच्छा तसेच प्रचंड बुद्धिमत्ता, भरपूर गुण असावे लागते. तसेच आवड, दृष्टी आणि भविष्यातील योजना यासर्व गोष्टींचा अनुभव घेत पूजा हिने जर्मनीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केले, त्यानुसार तिचे सिलेक्शन झाले. आणि ती दोन वर्षापूर्व जर्मनीकडे रवाना झाली. आता तिचे मास्टर ऑफ एमबीए मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण झाले असून त्या शिक्षणाचा निकाल जाहीर झाला आहे.

पूजा हि या शिक्षणामध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. घवघवीत यश मिळवून यशाची उंच शिखरे गाठली आहे. हि बातमी मोटवानी परिवाराला मिळताच पूजाला तिच्या नातेवाईकांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे लक्ष्मीकांत मोटवानी यांनासुद्धा पोलीस दल व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.