पनवेल तालुका इंटक अध्यक्षपदी दिपक ठाकूर यांची नियुक्ती
सिटी बेल लाइव्ह /प्रतिनिधी/ पनवेल #
महेंद्र घरत यांच्या पनवेल येथील कार्यालयात छोटेखानी झालेल्या कार्याक्रमात दिपक नामदेव ठाकूर, रा. भाताण यांची पनवेल तालुका इंटक अध्यक्षपदी तर राजेंद्र जगन्नाथ भगत, रा. चिरनेर यांची उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्षपदी तसेच कु. आदित्य यशवंत घरत, रा. जासई यांची उरण तालुका युवा इंटक सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, महाराष्ट्र इंटकचे सचिव पि.के. रामण, महाराष्ट्र इंटकचे सहसचिव वैभव पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, इंटकचे मुरलीधर ठाकूर, जयवंत पाटील, विवेक म्हात्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
गेली अनेक वर्ष कामगार क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या तरूणांना त्यांच्या कार्याची दखल घेवुन व त्यांच्या कामास पदाची जोड मिळून त्यांना पूढे कामगार क्षेत्रात काम करण्यास प्रोस्ताहन देण्याच्या हेतूने इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांनी उरण व पनवेल मधील तरूणांना इंटकच्या राष्ट्रीय प्रवाहात आणून इंटक संघटना वाढविण्याच्या दृष्टीने नेहमीच पूढचे पाऊल टाकले आहे.आज त्यांच्या सोबत २०० ते ३०० तरूणांची फौज कामगार क्षेत्रात काम करत आहे व त्यामुळेच कामगार संघटना रायगड जिल्हयात वाढतआहे. - वैभव पाटील,महाराष्ट्र इंटक सहसचिव






Be First to Comment