सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
प्राथमिक आरोग्यकेंद्र आंबेवाडी येथे दि. २०जून २०२१ ला कोविड शिल्ड चा ७०डोसांचा साठा उपलब्ध होता. याचा लाभ परिसरातील ७० नागरिकांनी घेतला. विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्यकेंद्रातून लसीकरण घेतल्या नंतर घरी गेलेल्या नागरिकांची दूरध्वनीद्वारे तब्येतीची विचारपूस आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्यिका सौ. रेश्मा रविंद्र पानसरे नियमितपणे करत असतात. जर एखाद्या व्यक्तीला ताप वगैरे आला असेल तर त्या व्यक्तीस योग्य तो सल्ला देत असतात.
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीचे वैद्यकीय अधिकारी श्री. कृष्णा चव्हाण, डॉ. अंकिता भोईर तसेच आरोग्य सेविका रीना रेवाळे, आरोग्य सेवक श्री. गणेश शिरसाट, गटप्रवर्तक प्रिती मोरे, स्टापनर्स स्वप्नाली जांभळे त्याच प्रमाणे आरोग्य सहाय्यक श्री. गायकवाड व वाहन चालक किशोर महाडिक आदिंचे सहकार्य कोरोना काळात अत्यंत महत्त्वाचे ठरत असून परिसरातील नागरिक त्यांना धन्यवाद देत आहेत.








Be First to Comment