सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण शिक्षण महिला समितीच्या पीएसएमएस स्कूल मध्ये पालक वर्गाकडून सन 2020/21 वर्षाची फी 50 टक्के स्वीकारण्यात यावी व आॅनलाईन पासवर्ड मिळावे याकरिता मागील 8 महिन्यांपासून सातत्य पूर्ण निवेदन द्वारे मागणी होत होती.मात्र फी भरली नसल्याने शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पासवर्ड बंद केले आहेत ते तात्काळ सूरु करावे याकरिता आज विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.
पण शाळा प्रशासन याबाबत कुठलेही सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने सर्व पालकांनी जमून याबाबतचे पुन्हा निवेदन दिले आणि शिक्षण हक्क कायद्याने पासवर्ड न दिल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचे पालकांनी निदर्शनास आणून दिले यात मूलभूत अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नंदा म्हात्रे यांनी पालक आणि शाळा व्यवस्थापन व शिक्षक यात समन्वय साधून विचार मांडले अखेर शाळा प्रशासनाने मागील वर्षाची निम्मी फी स्वीकारून पासवर्ड देण्याचे मान्य केले. तसेच फी बाबतचा अंतिम निर्णय पालक वर्ग आणि शाळेचे संचालक मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत ठरविण्यात येईल असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.







Be First to Comment