Press "Enter" to skip to content

अल्पवयिन मुलाचे अपहरण

पनवेल | वार्ताहर |

एका 17 वर्षीय मुलगा हा त्याच्या कुटूंबासमवेत गावी जाणार असल्याने प्रवासात लागणाऱ्या पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याकरीता त्याला आणण्यास सांगितले असता तो त्या बाटल्या घेऊन परत न आल्याने त्याचे कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.             

सदर मुलगा हा अंगाने मजबूत, रंगाने सावळा, डोळे काळे, केस काळे बारिक, नाक सरळ, अंगात काळ्या रंगाचा फूल शर्ट व चॉकलेटी रंगाची फूल जीन्सपॅंट घातली आहे. या मुलाबाबत कोणास अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.