Press "Enter" to skip to content

लसीकरण जागृतीसाठी तहसीलदार इरेश चप्पलवार यांची वाडीवस्तीवर भेट

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

कोरोना संसर्गापासून बचावासाठी संजीवनी असलेली लस मनात कोणतीही भीती न बाळगता घ्यावी असे आव्हान खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी केले .

मंगळवारी तालुक्यातील विविध आदिवासी वाडी-वस्तीवर लसीकरण जनजागृतीसाठी फिरत होते. खालापूर तालुक्याला कोरोना च्या दुसरया लाटेचा मोठा फटका बसला होता .सध्या लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसरा लाटेच्या भीतीने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन देखील सावध झाले आहेत. ह्या सावधगिरीचा एक भाग म्हणून रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांच्या सूचनेनुसार खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार तालुक्यात जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण मोहीम तालुक्यात यशस्वी रितीने राबविण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे या लसीबाबत संभ्रम आणि भीतीचे वातावरण आदिवासी समाजात असल्याने हा समाज लसीकरणापासून दूर आहे. तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून कोरोना दुसरा लाटेचा फटका देखील बसला आहे .त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आणि आदिवासी समाजामध्ये जनजागृतीसाठी खालापूर तहसीलदार यांनी मंगळवारी तालुक्यातील दहिवली आदिवासी, वाडी देवन्हावे आदिवासी वाडी, ठाणेन्हावे, मिरकुटे वाडी आदिवासी वाडी या ठिकाणी भेट दिली .

यावेळी त्यांच्या समवेत गॅमप्रो कंपनीचे मालक आनंद गुप्ता, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, देवन्हावे सरपंच अंकित साखरे ,ठाणे नवे सरपंच रमेश गोरले, तलाठी भरत सावंत तसेच कोतवाल व इतर कर्मचारी होते .तहसीलदाराने वाडीवस्तीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत लसीकरणाचे फायदे समजावून सांगितले. जनजागृती मोहीम सर्वत वाड्यांवर करण्यात येणार आहे.

तालुक्यात जास्तीत जास्त लसीकरण
करून तालुका कोरोन मुक्तीच्या दिशेने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे .ग्रांप्रो कारखान्याचे मालक आनंद गुप्ता यांनी सामाजिक बांधिलकीतून लसीकरण मोहीम स्वतः राबवत प्रशासनाला सहकार्य केले आहे असे अनेकानी पुढाकार घेतल्यास आरोग्य विभागा वरचा ताण कमी होणार आहे .लसीकरणाबाबत कोणतीही भीती मनात न बाळगता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

इरेश चप्पलवार

– तहसीलदार खालापूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.