सिटी बेल | पेण | वार्ताहर |
कोरोना महामारीमुळे मागील सुमारे दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण न देता फी चा तगादा लावणार्या पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज प्रायव्हेट हायस्कूला घेराव घालून फी माफ करण्याची मागणी केली.
संपुर्ण देशात मागच्या दोन वर्षोपासून कोरोना महामारीमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाने सुद्धा सगळीकडे बोंबाबोंंब आहे अशातच येथील शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना न शिकवता केवळ युट्युब वरील व्हिडीओ विद्यार्थ्यांना व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठवतात शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन शिक्षक करीत नाहीत अशी परिस्थिती असताना देखील शाळेकडून विद्यार्थ्यांच्या पालकांंना फी भरण्याकरिता वारंवार तगादा लावला जात असल्याने संतप्त पालकांनी अनेकदा शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने आज पेण एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांना जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळेच्या कार्यालयाला घेराव घातला.
यावेळी बोलतांना पालक प्रतिनिधी संदीप तोंडीलकर म्हणाले की कोरोना महामारीमुळे अनेक नागरिकांचा व्यवसाय धंदा ठप्प झाला आहे पालकवर्ग आधीच आर्थिक अडचणीत आहेत तसेच शाळेकडूनही विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्याने शाळा प्रशासनाने इंग्रजी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 50 टक्के कमी करावे अशी मागणी करीत येत्या पंधरा दिवसात शाळेय प्रशासनाने निर्णय न घेतल्यास यापैक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा त्यांच्यासह पालकवर्गानी दिला आहे. यावेळी देवेंद्र पाटील, वैभव घोसाळकर, माधवी म्हात्रे, मनिषा पाटील, भक्ती शेट्टी, अर्चना ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते.
शैक्षणिक शुल्क घेण्याची परवानगी शासनाच्या परिपत्रकात नुसार देण्यात आली असल्याने संस्था केवळ शैक्षणिक शुल्काची मागणी करीत आहे. अशैक्षणिक फी ची आकारणी पालकांकडून करण्यात आलेली नाही. त्याच प्रमाणे 12 महिन्यांची फी न घेता केवळ 10 महिन्यांची फी घेण्यात येणार आहे संस्थेनी त्यांना अशीही सवलत दिली आहे. त्यामुळे पालकांनी केवळ 72 टक्के फी भरावी अशी माहिती शाळेचे संचालक सुधीर जोशी व प्रशांत ओक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.








Be First to Comment