सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा औद्योगिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या सुदर्शन कंपनीच्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या कोविड लसीकरण मोहीमेचा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
12 हजार लसीकरणाचा उद्दीष्ट ठेऊन हे लसीकरण चार टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या लसीकरणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी कर्मचारी कामगार व त्यांचे कुटुंबीय, नागरीक सुरक्षित राहतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुप मोठी मदत ह्या कंपनीच्या माध्यमातून होत आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते 21जून रोजी करण्यात आले, रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन कंपनीच्या आवारात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ यशवंराव माने, तहसीलदार कविता जाधव, पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, सुदर्शन वेवस्थपकिय संचालक राजेश राठी, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष वीज, प्रमूख मनुष्यबळ व्यस्थापक शिवलीला पाटील, कंपनी प्रमूख विवेक गर्ग, प्रमूख व्यवस्थापक व सामजिक बांधिलकी विभाग प्रमुख माधुरी सनस, यासह अनेक नागरीक, कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थीत होते.








Be First to Comment