Press "Enter" to skip to content

पर्यटनासाठी येणाऱ्यांची रॅपिड अँटीजन ; तपासणीत सहा कोरोनाबाधित

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

चौक,कर्जत,लोणावळा या परिसरात पर्यटनास येणाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली.यात सहा जण पॉझिटिव्ह होते.

पावसाळा सुरू झाल्याने पनवेल, नवीमुंबई,मुंबई या परिसरातून तरुणाईंचा ओढा लोणावळा येथील भुशीडॅम, खंडाळाघाट, खोपोली येथील झेनिथ धबधबा,कर्जत तालुक्यातील पळसदरी व ग्रामीण भागातील सुंदर परिसर, तर चौक परिसरातील मोर्बे धरण परिसर,भिलवले व कलोते येथील धबधबे व या ठिकाणची डोंगर उतारावर असलेल्या धबधबा यांच्याकडे आकर्षित होतात, पण सद्या या परिसरात जमावबंदी लागू केली असून सर्वांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही या परिसरात तरुणाई जाण्यासाठी उत्सुक असतात.

सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. आणि याला कारणही शहरी भागातून आलेल्यांच्या संसर्गातून होत आहे. म्हणून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. किरण पवार व खालापूर तालुका आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रसाद रोकडे यांनी खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते व चौक पोलिसांच्या सहकार्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर कर्जत व खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दुचाकीस्वार इतर वाहने त्याचप्रमाणे या नाक्यावरील स्थानिक दुकानदार, हॉटेल कर्मचारी यांची रॅपिड अँटीजन तपासणी केली.यात सहा जण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांचा तपासणी अहवाल आय.सी.एम.आर.यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पवार, डॉ.कार्तिक कपूर,चौक पोलीस, बोरगाव, चौक आरोग्य कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.