सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
तीन महिन्यापासून असलेला लॉकडाउन, हाताला काम नाही, अशातच निसर्ग चक्रीवादळ आले, त्यात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांचे नुकसान झाले, ही बाब झुगरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी विजय नाझरे यांचेमार्फत डोंबिवलीच्या ओंजळ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अरविंद बिरमोळे व विश्वस्त संतोष कामत , स्वप्ना नाईक, यांच्या कानावर घातली व मदतीचे आवाहन केले.
त्यानीही तात्काळ होकार देत झुगरे वाडी येथे पाण्याची टाकी व करकुलवाडी येथे टाकीसह सर्व लागणारे साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले, परंतु करकुलवाडीला पाणी आणणार कसे ही अडचण होती ही पाण्याची सोय पत्रकार दिपक बोराडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय अनंत पांडुरंग बोराडे यांचे स्मरणार्थ त्यांच्या खाजगी मालकीचे बोरवेल मधून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे या दोन्ही वाड्या ना आता पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, त्यामुळे दोन्ही वाडीतील ग्रामस्थांनी व शिक्षकांनी ओंजळ फाउंडेशन चे वर्षा अय्यर, संतोष कामत, जयंत चव्हाण, राकेश भानुशाली, आर. एस. अय्यर ,रवी गावरे, दीपिका कोळंबे, खजिनदार, अनुजा बिरमोळे, उमेश घाग, शोभना शिंदे या सर्वाचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,लक्ष्मण झुगरे, उपाध्यक्ष, वसंत पारधी, पल्लवी म्हसे, रवी काजळे यांनी आभार व्यक्त करून योग्य वेळी मदत उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले असून भविष्यात ही गरज असलेल्या ठिकाणी मदत करण्याचे आश्वासन संस्थेच्या पदाधिकारी यांनी दिले आहे.
Be First to Comment